भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती : प्रेरणात्मक प्रवास
ताईंचा आपला शैक्षणिक अनुभव, नम्र स्वभाव, प्रबळ राष्ट्रनिष्ठा आणि उत्तम अशा राजकीय कारकिर्दीचे पाठबळ यामुळे त्यांना या सर्वोच्च पदावर जाण्याचा बहुमान प्राप्त झाला. तत्पुर्वी हे पद डॉ. अब्दुल कलाम यांच्यासारख्या प्रखर बुद्धिमत्तेच्या शास्रज्ञाने भूषविले होते. त्यांच्यानंतर या पदावर काम करणे हे कठीण आहे असे समजले जात होते. त्यामुळे या पदाचा लौकिक सांभाळणारी योग्य व्यक्ती असली पाहिजे असा एक सूर होता. ताईंनी आपली या पदावरची योग्यता, यथायोग्य आचरण, विनयशीलता, शांत स्वभाव आणि प्रचंड आत्मविश्वासाने राष्ट्रपती भवनात प्रवेश केला. तो काळ राजकीय दृष्ट्या खूप संवेदनशील होता. अशा या वातावरणात एका स्त्रीला जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीची सूत्रे चांगल्या प्रकारे सांभाळता येतील का ? ही शंका व्यक्त केली जात होती. चांगले बहुमत मिळवून त्यांनी आपल्या टीकाकारांची तोंडे बंद केली. आपल्या पाच वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी न डगमगता जनहित व घटना अबाधित ठेवण्याची शपथ पाळण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.
व्हिडिओ
माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांचा शपतग्रहण विधी.
” प्रजासत्ताकाची पहिली सेविका होणे हा अनुभव मी विनम्रतेने स्वीकारत आहे “
– श्रीमती प्रतिभाताई पाटील
ग्रामीण सुधारणांना प्रोत्साहन

ग्रामीण भागातून आलेल्या श्रीमती प्रतिभा पाटील यांनी नेहमी ग्रामीण भागातल्या लोकांच्या क्षमतेवर विश्वास दर्शिवला आहे. परंतु ग्रामीण भागात राहणा-या लोकांना त्यांची क्षमता दाखवण्याची योग्य अशी संधी मिळत नाही. त्यासाठी, श्रीमती प्रतिभा पाटील यांनी ग्रामीण जनतेच्या अभिनव विचारांना एक व्यासपीठ मिळावे म्हणून राष्ट्रपती भावनाचीच निवड केली.
सामाजिक दृष्ट प्रवृत्तीला विरोध

- स्त्री भ्रूणहत्या
- लिंग असमानता
- नशा आणि मादक द्रव्याविरुध्द लढा
- हाताने मैला स्वच्छ करण्याच्या दुष्प्रवृत्तीविरुध्द लढा
- शैक्षणिक संस्थामध्ये होणाऱ्या रॅगिंगबाबत चिंता
जागतिक व्यवसायाची उभारणी

राष्ट्रपतीपदांवर असताना तार्इंनी राष्ट्राचे हित जपण्यासाठी आणि द्विस्तरीय संबंध सुधारण्यासाठी परदेशांना भेटी दिल्या. यात प्रामुख्याने जी-5 (रशिया, चीन आणि युके) चा समावेश होता. याबरोबरच उपखंडातील लॅटिन अमेरिका (ब्राझिल, मेक्सिको आणि चिली) यांच्यासमवेत पहिल्यांदाच व्यवसायवाढीच्या दृष्टीने प्रयत्न केले गेले. तसेच वसाहतवाद आणि वर्णद्वेषाविरुध्द लढा देणाऱ्या अफ्रिकेचा (मॉरिशस, सेशेल्स आणि दक्षिण अफ्रिका) दौराही त्यांनी केला. सार्कच्या विकासातील सहभाग (भूतान आणि ताजिकीस्थानच्या) भेटीत भारताची मध्य-आशियातील महत्त्वाची भूमिका विशद केली. पूर्व आणि दक्षिण आशिया (लाओस, कंबोडिया, इंडोनेशिया, व्हिएतनाम, दक्षिण कोरिया आणि मंगोलिया) यांना भेट देताना भारताचे त्यांच्याबाबत असलेली सौहार्दाची भूमिका त्यांनी आपल्या भेटीत विषद केली .
भारतीय लष्काराच्या सरसेनापती

राष्ट्रपतीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर ताई या भारतीय लष्काराच्या पहिल्या महिला सरसेनापती बनल्या. आपल्या कार्यकाळात त्यांनी दुर्गम अशा लष्काराच्या छावण्यांना भेटी दिल्या. ते करत असलेल्या अलौकिक राष्ट्रीय कार्याबद्दल सैन्यदलाना नेहमी प्रोत्साहन दिले. त्यांचे प्रश्न समजून घेतले. जवानांचे मनोबल वाढावे म्हणून सुखोई ३० या super-sonic speed ने जाणाऱ्या भारतीय हवाई दलाच्या फायटर विमानातून GI सूट घालून वयाच्या ७४ व्या वर्षी अवकाश भरारी घेतली अशी भरारी घेणा-या त्या जगातील पहिल्या एकमेव महिला ठरल्या. त्याच दिवशी त्यांना रशियाचे राष्ट्रपती मिदवेदेव्ह यांचा लगेचच फोन आला, ताईंचे या धैर्यपूर्ण कामगिरीबद्दल त्यांनी त्यांचे अभिनंदन केले. हा आयुष्यातील त्यांचा महत्वाचा क्षण होता.
सामाजिक प्रश्नांशी बांधिलकी
जनसंपर्क

