व्यापारी प्रतिनिधींची महत्वाची कामगिरी
ब्राझिल
- कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीच्या (सीआयआय) प्रतिनिधींनी फिरझान (फेडरेशन ऑफ इंडस्ट्रीज ऑफ द स्टेट ऑफ स्टेट ऑफ रियो डीजानेरीओ) या ब्राझिलच्या फेडरेशनबरोबर व्यापार आणि गुंतवणूक संबंधीच्या सामंजस्य करारांवर सह्या केल्या.
- कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीच्या (सीआयआय) प्रतिनिधींनी सेसी (ब्राझिल उद्योगांचे राष्ट्रीय संघटन) ही ब्राझिलच्या नॅशनल कॉन्फेडरेशन ऑफ इंडस्ट्रिज, ब्राझिल यांच्याबरोबर सामाजिक कल्याण आणि सामाजिक दायित्व यासंबंधीच्या सामंजस्य करारांवर सह्या केल्या.


मेक्सिको
- कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीच्या (सीआयआय) प्रतिनिधींनी कॉमसे (मेक्सिकन चेंबर) या मेक्सिकोच्या व्यापारी महामंडळाबरोबर व्यापार आणि गुंतवणूक यासंबंधी भारत आणि मेक्सिको यांच्यात संयुक्त व्यासपीठ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
- भारत-मेक्सिकन बिझनेस चेंबर यांनी सेवा या संस्थेच्या मदतीने मेक्सिको येथे स्वतंत्र परिषद स्थापण्याचा निर्णय घेण्यात आला.
चिली
- एन. आय. आय. टी. (नॅशनल इन्फॉरमेशन फॉर इन्फॉरमेशन टेक्नोलॉजी) या संस्थेने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील शिक्षणासाठी चिली-इंडिया चेम्बर ऑफ कॉमर्स आणि कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीच्या या संस्थांनी केलेल्या चर्चेनुसार भागीदारीचा करार केला.


व्हिएतनाम
- विविध औद्योगिक क्षेत्रात काम करणार्या केसीपी लि. यांनी व्हिएतनाम येथे साखर कारखाना काढला आहे.
- अंगेलिक या आंतरराष्ट्रीय कंपनीने पायाभूत सुविधेसंबंधीचा एक प्रकल्प हाती घेतला आहे.
- विशेष म्हणजे या दोन्ही कंपनीचे संस्थापक प्रमुख भारतीय आहेत.
स्पेन
- स्पेनच्या पर्यावरण, ग्रामीण आणि सागरी मंत्रालयाबरोबर भारताच्या कृषी खात्याने सामंजस्व करार केला.
- भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालयांबरोबर स्पेनच्या उद्योग, व्यापार आणि पर्यटन मंत्रालयांने भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाने नवीकरणीय ऊर्जेसंबंधी सामंजस्य करार केला.
- भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयांने स्पेनच्या उद्योग, व्यापार आणि पर्यटन मंत्रालयाबरोबर पर्यटनासंबंधी सामंजस्य करार केला.


पोलंड
- पर्यटन, आरोग्य आणि वैद्यकशास्त्रासंबंधी भारत आणि पोलंड सरकारमध्ये करार झाले. विशेष म्हणजे या करारांत योग आणि आयुर्वेदाच्या अभ्यासाचा प्रामुख्याने समावेश आहे.
ताजिकीस्थान
- रशिया आणि चीन यांचे तगडे आव्हान असूनही एटलस सायकलने गुणवत्तेवर मात केली.


युनायटेड किंगडम
- कॉमनवेल्थ क्रीडा संघटन समिती आणि भारतीय वाणिज्य व उद्योग महासंघ यांच्यामध्ये २०१० साली दिल्ली येथे होणार्या कॉमनवेल्थ क्रीडा सामन्यासाठी सामंजस्य करार झाले. यामुळे भारताला गुंतवणूकीसाठी आणि आंतरराष्ट्रीय व्यवसायासाठी चांगले पर्याय उपलब्ध झाले.
युएइ ( संयुक्त अरब अमिराती )
- भारत अर्थ मूवर्सच्या कार्यकारी संचालकाची दुबई मेट्रोच्या वरिष्ठांशी आवश्यक त्या पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी यशस्वी बैठक संपन्न झाली.
- अपोलो हॉस्पिटलला युएइमध्ये सल्लाकेंद्राची स्थापना करण्यासाठी मान्यता मिळाली.


मॉरिशस
- मॉरिशसमध्ये सिमेंट ग्रायडिंग आणि पॅकेजिंग संच बसविण्यासाठी भारतीय व्यावसायिकांनी आवश्यक ते प्रशिक्षण आणि संशोधन करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यासाठी मॉरिशसच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली गेली.
दक्षिण कोरिया आणि मंगोलिया
- निर्मल सीड्स आणि कोरियन अग्री इंडस्ट्रीज यांचा पपया आणि इतर कृषीजन्य पदार्थांच्या अधिक चांगल्या गुणवत्तेच्या उत्पादनासाठी करार संपन्न झाला.
- मंगोलियाची पर्यटन कंपनीबरोबर भारताच्या सिक्कर ट्रॅव्हेल प्रा. लि. बुध्द पर्यटन स्थळाना भेट देण्यासाठी तसेच शैक्षणिक सहली आयोजित करण्यासाठी करार करण्यात आला.
- भारतातील मुकुल कंपनीचा वीज आणि ऊर्जा क्षेत्रात करार करण्याची बोलणी अंतिम टप्प्यात आली आहेत.


स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रिया
- मोदी एंटरप्रायझेस यांनी दोन महत्वाच्या क्षेत्रात करार केले आहेत. त्यातील नॉरडिक इंटरनॅशनल होल्डिंग्स यांच्याबरोबर चैनीच्या वस्तू पुरवठ्यासंबंधी आणि स्विस फेडरल इन्स्टिटयूट फॉर टेक्नोलॉजी यांच्यासमवेत हरित तंत्रज्ञानाच्या वापरांसाठी झारखंड येथे निर्माण होणार्या विद्यापीठात या तंत्राचा समावेश होणार आहे.
- चार्टरर्ड अकाउन्टन्ट डॉ आश्विनी गुप्ता यांच्या फर्मने ‘हिज बीएसई एसएमई स्टॉक एक्सचेन्ज’ यांच्यासाठी तीन महत्वाच्या करारांवर चर्चा सुरू केल्या आहेत. त्याजबरोबर स्विस इंडिया चेम्बर ऑफ कॉमर्स, क्रेडिट सुस आणि केपीएमजी यांच्यासमवेत पुढील चर्चा चालू आहेत.
- आपल्या उत्पादित वस्तूसंबंधी होरायझन ग्रुप ऑफ कंपनीच्या तीन नव्या ग्राहकांच्या बरोबर चर्चा चालू आहेत
- स्विस फेडरेशन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यांची महाराष्ट्रातील डी. वाय. पाटील ग्रुप यांच्याबरोबर पुणे येथे शून्य उर्जा इमारत उभारण्यासाठी चर्चा सुरू आहे.
- काजडे ग्रुप ऑफ कंपनीजने स्विस आणि ऑस्ट्रिया यांच्याशी तंत्र-बदल यासंबंधी अनेक करार केले. त्यांना १०-१२ कंपनीकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. तसेच ते फ्रेलो या आस्ट्रियन कंपनीशी बांधकाम क्षेत्रात काम करण्यासाठी संयुक्तपणे योजना आखत आहेत.
- स्वित्झर्लंडमध्ये बँक ऑफ बडोदा या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेची शाखा सुरू करण्यासाठी चर्चा सुरु आहे.
सेशेल्स आणि दक्षिण अफ्रिका
- भारतातल्या व्यापारी प्रतिनिधींना सेशेल्स सरकारकडून परदेशी गुंतवणूकदारांना मिळणार्या सवलती (करमुक्ती) आदि संबंधी सविस्तर माहिती देण्यात आली. इन्फोसिस बीपीओ लि. , केम्ब्रिज टेक्नोलॉजी आणि सार्क अॅण्ड असोसिएट (आर्थिक सेवा) यांनी या संदर्भात कार्यवाही सुरू केली असून ते अधिक प्रगती करतील अशी आशा आहे.
- दक्षिण अफ्रिकेत बांधकाम क्षेत्र, पायाभूत विकास क्षेत्र आणि माहिती-संचरण क्षेत्राबरोबरच उत्पादन कृषी-प्रक्रिया केंद्र, खाण आणि ऊर्जा विभाग यामध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे.

बांधकाम, पायाभूत सुविधा आणि माहिती-संचरण
- एज्युकॉम्प ग्लोबल सोलुशन्स यानी आपल्या प्रशिक्षणाच्या सेवा बी (ब्लॅक इकॉनॉमिक एम्पॉवरमेंट) या संस्थेला दिल्या . त्यांच्याबरोबर पुढील चर्चा सुरू आहेत.
- इन्फोसिस बीपीओ, लि. यांनी आपल्याद्वारे दिल्या जाणार्या विविध सेवांचे महत्व आपल्या जगभरांतील ग्राहकांना समजाविले. त्याचा नेमका उपयोग दक्षिण अफ्रिकेला कसा होईल यासंबंधीची सातत्याने चर्चा सुरू आहे.
उत्पादन व कृषी-प्रक्रिया क्षेञ
- या देशांत कर-सवलती चांगल्या प्रकारे मिळत असल्याने दक्षिण अफ्रिकेत दुनार फूड्स, सम्राट बिव्हरेचेस या कंपन्याना उत्पादन, कृषी-प्रक्रिया संच उभ्या करण्याच्या प्रक्रियेला गती मिळाली.
खाणकाम आणि ऊर्जा
- अॅक्शन ग्रुप ऑफ कंपनीज यांनी खाणकाम क्षेत्रात अधिक काम करण्याच्या दृष्टीने चर्चा सुरू ठेवल्या. त्यामुळे प्लॅटिनम, कोळसा, सोने यासारख्या व्यावसायिक दृष्ट्या महत्वाच्या कार्याला गती मिळाली.