“शैक्षणिक बाबीना मी नेहमीच प्राधान्य देत आले आहे. आधुनिक शिक्षणाची गंगा ही प्रत्येक व्यक्ति-स्त्री-पुरुष, मुलगा-मुलगी यांच्यापर्यंत सहजपणे पोचली पाहिजे. विशेषकरून स्त्रीयांचे सक्षमीकरण हे माझ्या दृष्टीने अधिक महत्वाचे आहे ते प्रत्यक्षात आल्यास राष्ट्राच्या सक्षमीकरणाची वाटचाल सुलभ बनेल.”
“चित्रपट हे केवळ समाजापासून वेगळे असे माध्यम नाही. तसेच ते वास्तवापासून दूरही नाही. चित्रपटांतून समाजाचे सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक विचार प्रतिबिंबित होत असतात. त्याचा काही अंशी परिणाम समाजावरही होत असतो. त्यासाठी भारतीय चित्रपट उद्योगाने समाजाप्रती आपल्या जबाबदारीचे भान ठेवले पाहिजे आणि मानवी मूल्यांची जपणूक करण्यासाठी स्वत:ला सिध्द केले पाहिजे.”
“शेती संशोधन केंद्रानी मातीची गुणवत्ता, जल-संधारण, एकात्मिक पौष्टिक व्यवस्थापन, शेती संबंधित उपयुक्त माहितीचा प्रसार अणि उत्पादित क्षेत्रापासूनच विपणनाच्या सर्व सोयी-सुविधा शेतकऱ्यांना दिल्यास त्याचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल व ते आत्मनिर्भर होतील. प्रत्येक ग्राम पंचायत उपयुक्त माहितीचा स्त्रोत बनायला हवी. शेतीमधील उत्पादन वाढविण्यासाठी रेडिओ, टी.व्ही. आणि इतर अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर व्हायला हवा. त्यासंबंधीच्या उपयुक्ततेची माहिती ही वेळीच शेतकऱ्यांच्यापर्यंत पोचायला हवी.”
“शाश्वत विकासासाठी आणि दारिद्र्य निर्मलूनाच्या कामी ऊर्जा अत्यंत महत्वाची आहे. वाढत्या ऊर्जेची सातत्याने होणारी वाढती मागणी आणि त्याचा रास्त पुरवठा हे एक मोठे आव्हान आहे. यासाठी आपल्याला त्रिस्तरीय योजनेवर काम करावे लागेल – ऊर्जेचा योग्य पुरवठा, साधन-सुविधांचा योग्य आर्थिकदृष्ट्या परवडणारा वापर आणि शक्य तेव्हा ऊर्जेची बचत केल्यांस सर्वांनाच त्याचा फायदा होईल.”
“मानवी आत्मसन्मान हा मानवी आचरणाचा कणा आहे. भारतीय घटनेमध्ये व्यक्तिच्या आत्मसन्मानाला अत्यंत महत्वाचे स्थान दिले गेले आहे. ते राष्ट्राच्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये न्यायाची भूमिका बजावते. त्यामुळे विकासाला गतीही मिळते. समाजातील सर्व घटकांच्या विकासासाठी विशेषकरून वंचित आणि दुर्लक्षित घटकांच्या विकासासाठी ते अधिक महत्वाचे आहे. यासाठी समाजातील दुजाभाव नष्ट करणे आवश्यक आहे. प्रत्येकाच्या किमान गरजेची पूर्तता होणे गरजेचे आहे. यासाठी विकासाच्या योग्य योजना आखून त्याची प्रभावी अंमलबजावणी केल्यास योग्य तो परिणाम दिसून येईल. मानवी विकासाच्या दृष्टीने ते योग्य पाऊल ठरेल.”
“समाजातील वंचित आणि दुर्लक्षित घटकांच्या गरजांची पूर्तता करणे ही आपली प्राथमिकता हवी तरच आपल्याला आपल्या भविष्याची आखणी योग्य प्रकारे करता येईल. यामध्ये मागासवर्गीय जाती-जमाती, अधिसूचित जमाती आणि समाजातील इतर दुर्बल घटक यांचे सक्षमीकरण करणे याला प्राधान्य द्यायला हवे. आपल्या देशाच्या उज्ज्वल विकासांमध्ये आणि वाढीमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असला पाहिजे. त्यासाठी आपले प्रयत्न आणि समाजाप्रती बांधिलकी असणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्वांनाच त्याचा लाभ होईल. आपण समाजाच्या उन्नतीसाठी करत असलेले प्रयत्न हे कुठल्याही परिस्थितीत अपूर्ण राहता कामा नयेत. राष्ट्रपिता महात्मा गांधी म्हणाले होते‘ समाजातील सर्व घटकांच्या डोळयातील अश्रू पुसणे हे आपले परमकर्तव्य आहे’.”
“आपल्याकडील सर्व औद्योगिक वसाहती, व्यापार संकुले आणि रहिवाशी वस्ती या पर्यावरणपूरक हरित रचनांना प्राधान्य देऊन आखायला हव्यात.”
“समाजातील विविध घटकांमध्ये वादविवाद होत असतात, पण त्यासाठी न्यायालयात दावा दाखल करणे आवश्यक नसते. वकिल हे आपल्याला न्याय मिळावा यासाठी प्रयत्नशील असतात. आपसातील वाद सामोपचाराने सोडविण्यासाठी अनेक मार्ग असू शकतात. त्यासाठी कटुता निर्माण न होऊ देता आणि वाद किचकट न बनविता ते सहजरीत्या सोडविता येण्यासाठी अनेक चांगले पर्याय निर्माण करणे आवश्यक आहे तरच आपल्याला योग्यरीत्या आणि विनाविलंब न्याय मिळू शकेल.”
“सर्वांना परवडतील अशा रास्त दरांत वैद्यकिय सुविधा असणे आवश्यक आहे. ग्रामीण भागात राहणाऱ्या आणि समाजातील वंचित घटकांना या सुविधा प्राधान्याने देणे गरजेचे आहे.”
“मध्यस्ती करणे हे बरोबर, चुकीचे अथवा गैर असू शकत नाही. त्यामुळे वाद संपुष्टात येण्यास मदत होते. अशी यशस्वी मध्यस्ती करणारी व्यक्ति ही आदरांस पात्र ठरते. यामुळे वाद असणाऱ्या व्यक्तिंमध्ये योग्य मार्गाने सोडविल्याने समाजात आदराची भावना निर्माण होते. त्यामुळे प्रश्न सोडविण्याची मानसिकतेत योग्य असा बदल घडून येतो. याला समाज, शाळा, महाविद्यालये आणि कार्यालयांमध्ये व्यापक स्वरूप देण्याची आवश्यकता आहे. यामधून योग्य प्रकारे न्याय न मिळाल्याची भावना ज्या व्यक्तिमध्ये होते त्यानी न्यायालयात दाद मागावी.”
“सर्वांना शिक्षण ही मुलभूत गरज आहे.”