तार्इंनी आपल्या राष्ट्रपतीपदाच्या कारकिर्दीच्या काळात ज्या संघटना आणि व्यक्तींनी समाजातील दृष्ट प्रवृत्तीशी लढा देऊन त्या नष्ट करण्याचा प्रयत्न केला त्यांचा बहुमान केला. “सामाजिक न्याय आणि समानता ही समाजात असलीच पाहिजे, यासाठी आदर्श स्वरूपाची क्रांती ही आर्थिक कार्यक्रमांशी निगडीत असली पाहिजे.” असे मतही त्यांनी व्यक्त केले.
स्त्री भ्रूणहत्या
पंजाब राज्याच्या अमृतसर येथे ६ ऑक्टोबर २००९ साली झालेल्या ‘नन्ही छांव’ या स्वयंसेवी संस्थेने आयोजित केलेल्या परिषदेत ‘भ्रूणहत्या आणि स्त्री सक्षमीकरण’ या विषयांवर बोलताना त्यांनी मुलींना त्यांचे न्याय अधिकार मिळाले पाहिजेत आणि मुलींना वाचवा असे भावनात्मक आवाहन केले.
आंतरराष्ट्रीय महिला वर्षाच्या निमित्ताने ८ मार्च २००९ रोजी राष्ट्रपती भवनावर झालेल्या भव्य समारंभात मुलींना भ्रूणहत्येपासून वाचवा ही शपथ उपस्थित असलेल्या सामाजिक संघटनेच्या सभासदांनी आणि प्रतिष्ठितांनी या प्रसंगी घेतली. ‘स्त्री भ्रूणहत्येच्या अमानवीय कृत्याविरुध्द सातत्याने लढण्याचे आणि समाजात प्रचलित असलेल्या दुराग्राही प्रथेविरुध्द आपण सर्वांनी सातत्याने आणि मुलींच्या कल्याणासाठी आयुष्यभर निष्ठापूर्वक काम करण्याचे आवाहन त्यांनी यावेळेस केले .
लिंगभेद
तार्इंनी स्त्री-पुरुष समानता असावी आणि फेब्रुवारी २००८ साली यावर व्यापक चर्चा घडवून आणली. कुणावरही अन्याय होणार नाही यासाठी शासनातर्फे राबविलेल्या निरनिराळया कल्याणकारी योजनांमध्ये सातत्य असावे आणि त्यामध्ये द्विरुक्ती असू नये याबाबत एकमत घडवून आणण्याचा प्रयत्न केला. यामध्ये समाजाचे व्यापक प्रमाणावर हित साधले जाईल याची त्यांना खात्री होती. यामुळे निनिराळया शासकीय विभागातील सचिवांची समिती नेमली गेली. स्त्री -पुरुष समानता आणि सामाजिक कुप्रथेविरुध्द लढा अभ्यासगटाची नियुक्ती करण्यात आली. या अभ्यासगटाने या योजनांची योग्य पूर्ती निश्चित आणि अधिक चांगल्या स्वरूपात आणि नेमक्या कामासाठी होईल याची दक्षता घेण्याबाबत आदेश देण्यात आले.
नशा आणि मादक द्रव्याविरुध्द लढा
ताई महाराष्ट्राच्या मंत्री म्हणून काम करत असताना विदर्भातील पडलेल्या दुष्काळामुळे त्यांना आलेला अनुभव हा विदारक स्वरूपाचा होता. दुष्काळ निवारणाच्या आणि दारिद्र्य निर्मूलनाच्या कामासाठी भारत सरकारकडून मोठ्या स्वरूपात निधी पुरविण्यात आला होता. ताई या जिल्ह्याच्या पालकमंत्री होत्या. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून या कामाचे लेखा-परिक्षण झाले. त्यावेळी असे आढळून आले की, या निधीमुळे या गरीब मजूरांच्या राहणीमानात काहीही फरक झाला नाही. या योजनेखाली मिळालेल्या निधीचा वापर नशेसाठी आणि जुगार खेळण्यासाठी मोठ्या प्रमाणात झाला. त्याचा विपरीत परिणाम त्यांच्या आरोग्यावर तसेच कौटुंबिक स्वास्थ्यावरही झाला. त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवायचे असेल तर त्यांनी अशा व्यसनापासून दूर राहिले पाहिजे तरच त्यांची प्रगती होईल.
हाताने मैला स्वच्छ करण्याच्या दुष्प्रवृत्तीविरुध्द लढा
राजस्थानच्या अलवार येथील लक्ष्मी नंदाने आपण लिहिलेली कविता तार्इंच्या समोर वाचली. तार्इंना त्याचे खूप कौतुक वाटले. त्यानी तिला रु ५०० बक्षिसादाखल दिले. नंदाच्या दृष्टीने तार्इंच्याकडून मिळालेली ही अमूल्य भेट होती. २७ वर्षाच्या नंदाने लिहिलेल्या कवितेचे नाव होते ‘ पतनसे उडानकी तरफ’ (पतन होण्यापासून स्वातंत्र्याकडे). यामध्ये स्त्रीयांना हाताने स्वच्छतेचे काम करणाऱ्या स्त्रियांना त्यांच्या प्रगतीकडे वाटचालीची दिशा दाखविणाऱ्या या कवितेचा आशय होता. तार्इंनी तिला रु ५०० चे रोख बक्षिस दिले. नंदाने त्या बक्षिसाचा आनंदाने स्वीकार केला. ती म्हणाली , माझ्यासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. तार्इंनी दिलेले बक्षिस माझ्यासाठी अनमोल आहे.