दूरदृष्टी असलेला नेता आणि अभ्यासू सहकारी – डॉ. मनमोहन सिंग यांना निरोप
मी आज एक अतिशय अभ्यासू सहकारी गमावला आहे ज्यांच्यासोबत मी माझ्या राष्ट्रपती कार्यकाळात जवळून काम केले होते आणि त्यांचे अफाट ज्ञान, अनुभव आणि कौशल्य यावर मी खूप विसंबून होते. त्यांच्या सहवासातील अनेक आठवणी माझ्या स्मरणात आहेत. ते एक महान संसदपटू होते. भारताच्या आर्थिक सुधारणांचे शिल्पकार म्हणून त्यांच्या निधनाने आपल्या देशाने एक आदरणीय आणि समर्पित नेता गमावला आहे.
एका युगाचा शेवट : दूरदृष्टी असलेल्या नेत्याला निरोप
पद्मविभूषण श्री रतन नवल टाटा, एक दूरदर्शी उद्योगपती आणि परोपकारी, ज्यांच्या दयाळूपणाने आणि समर्पणाने असंख्य जीवनांना स्पर्श केला, त्यांच्या निधनाने मला खूप दुःख झाले आहे. 2008 मध्ये त्यांना पद्मविभूषण प्रदान करणे हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे, त्यांनी भारताच्या विकासात केलेल्या अतुलनीय योगदानाची दखल घेत. त्यांच्या कुटुंबियांना आणि टाटा समूहाप्रती माझ्या हार्दिक संवेदना आहेत. त्यांचा अखंडता, करुणा आणि राष्ट्राप्रती अथक बांधिलकीचा वारसा आपल्या सर्वांना प्रेरणा देत राहील. त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो.
सिम्बॉयोसिसच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालयाचे २१ नोव्हेंबर २०१५ रोजी उद्घाटन
पुण्यातील ख्यातनाम सिम्बॉयसिस इन्स्टिट्युटच्या प्रांगणात डॉ बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालयाचे उद्घाटन ताईंच्या हस्ते झाले. याप्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस आणि केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले उपस्थित होते. याप्रसंगी ताईंनी डॉ. आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यात अस्पृषता आणि सामाजिक सुधारणा यांच्यामध्ये पुणे कराराप्रसंगी झालेल्या चर्चेवर प्रकाश टाकला. डॉ आंबेडकरांनी भारतीय घटनेचे शिल्पकार आणि समाजातील वंचित घटकांना न्याय आणि सर्व नागरिकांना सुरक्षा प्रदान केलेल्या अमूल्य कामगिरीची त्यानी प्रशंसा केली.
‘रिइन्वेन्टिग लिडरशीप’ पुस्कतकाचे उपराष्ट्रपतींच्या हस्ते प्रकाशन
सुनैना सिंग यानी लिहिलेले ‘रिइन्वेन्टिग लिडरशीप’ या पुस्तकाचे प्रकाशन भारताचे उपराष्ट्रपती मा. हमीद अन्सारी यांच्या हस्ते झाले. या पुस्तकात ताईंच्या राष्ट्रपतीपदाच्या कारकिर्दीसंबंधीचा आलेख आहे. या प्रसंगी ख्यातनाम शास्त्रज्ञ डॉ रघुनाथ माशेलकर आणि भूतपूर्व केन्द्रिय मंत्री आणि राज्यपाल भीेष्म नारायण सिंग हे उपस्थित होतेे. या दोघांनी या प्रसंगी ताईंच्या सामाजिक कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला.
पद्मभूषण डॉ एच एल हिरानंदाणी कर्करोग तज्ज्ञांना पारितोषिक वितरण समारंभ
मुंबईतील हिरानंदाणी हॉस्पिटलने आयोजित केलेल्या पद्मभूषण डॉ एच एल हिरानंदाणी कर्करोग तज्ज्ञांना पारितोषिक वितरण समारंभाला ताई आणि महाराष्ट्राचे राज्यपाल श्री विद्यासागर राव उपस्थित होते. या प्रसंगी डॉ सुरेश अडवाणी यांना त्यांनी कर्करोगांसंबंधी केलेल्या विशेष संशोधनांसंबंधी हिरानंदाणी ट्रस्टतर्फे पारितोषिक देऊन ताईंच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कॅन्सर प्रतिबंधक राष्ट्रीय परिषदेचे उदघाटन
‘अखिल भारतीय कॅन्सर व्यवस्थापन परिषदेचे’ उदघाटन ताईंच्या हस्ते झाले. पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ बागूल आणि शामला देसाई यानी या परिषदेचे आयोजन केले होते. कॅन्सरसारख्या दुर्घर आचारांवर विविध प्रकारच्या उपचार पध्दती विकसित करून सकारात्मक रीत्या काळजी घेणार्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले. तसेच त्यांनी होमिओपॅथी आणि आयुर्वेद यांच्यातील चांगल्या उपचारपध्दती अॅलोपॅथीमध्ये समाविष्ट करून सर्वसामान्य जनतेला अधिक परिणामकारक उपचार मिळावेत यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले.